पुणे – पुण्यातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने केली. रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या.
यामध्ये मुक्त रिक्षा परवाना त्वरित रद्द करा, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची त्वरित स्थापना करा , पंधराशे रुपये अनुदान मिळण्यातील अडचणी दूर करा अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा पंचायत पुणे-पिंपरीच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी छत्री पॅटर्न वापरून मागण्या आणि घोषणा छत्रीवर लिहून मंगळवारी आंदोलन करण्यात आलं.