पुण्यात ‘मास्क’ गरबा रंगला

Madhuvan

आदिनाथ सोसायटीत सुरक्षा नियमांतर्गत नृत्य

बिबवेवाडी – नवरात्र सण म्हणजे प्रत्येक वर्षी गरबाप्रेमींना पर्वणी असते. मात्र, यावर्षी नवरात्र साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासन तसेच पालिका प्रशासनाने केल्या आहेत. यानुसार सामूहिक गरबा कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंदी आहे. याच पार्श्‍वभूमीवर गरबाप्रेमींनी ऑनलाइन गरबा नृत्य स्पर्धा आयोजित केल्या असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवरात्रोत्सवात जैन, गुजराथी समाजातील अनेकांच्या घरी देवीची स्थापना केली जाते. या कालावधीत दांडिया तसेच गरबा नृत्य हे विशेष ठरते. परंतु, यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता अनेक गरबाप्रेमी आपापल्या घरीच दांडिया, गरबा नृत्याचा सराव करीत आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांचे पालन करून असे सराव केले जात आहेत.

सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथे रंजूस वैष्णवी ग्रुपच्या मुली व मुले रंगबिरंगी पारंपरिक पोषाख तसेच मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग राखत गरबा सराव करीत आहेत. ही मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

करोनामुळे सर्व दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला असला तरी पहिल्यांदाच या नवरात्रात गरबाचे पारंपरिक कपड्यात आयोजन करण्यात आले, याचा तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन स्पर्धांचे आयोजित केले असून त्यासही प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही दांडिया, गरबा शिकवत असून ही नृत्य एक प्रकारचा व्यायाम असून ती आरोग्यास हितकारक आहेत.
– रंजूस ओसवाल, रंजूस वैष्णवी ग्रुप, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.