पिंपरीत दुपारी १ वाजेपर्यंत २१.६९ टक्के मतदान

पुणे – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. पिंपरीत आज दुपारी १ वाजेपर्यंत २१.६९ टक्के मतदान झाले आहे. यावेळी ७६,६९७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूण 3 लाख 48 हजार 462 मतदार असून, सोमवारी (दि. 21) मतदानातून मावळचा “कारभारी’ निवडणार आहेत. विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीसह अन्य तीन अपक्ष अशा सात उमेदवारांचे भवितव्य आज मतयंत्रात बंद होणार आहे.

एकूण मतदार : 3 लाख 48 हजार 462
पुरुष : 1 लाख 80 हजार 202
महिला : 1 लाख 68 हजार 256
तृतीयपंथी : 4
दिव्यांग मतदार : 640
एकूण मतदान केंद्र : 307
अधिकारी/कर्मचारी : 2,220
सर्वात कमी मतदार असलेले केंद्र : उधेवाडी, पालेनामा, वडिवळे, पारवडी, कोळेचाफेसर.
संवेदनशील केंद्र : खडकाळा 2, मंगरूळ 1, तळेगाव 3.

Leave A Reply

Your email address will not be published.