लाहोर : पाकिस्तानवरील संकटाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आर्थिक संकट आणि महागाई यात खंगून निघालेल्या पाकिस्तानवर आता आणखी एक संकट ओढवले आहे.पाकिस्तानच्या वीज यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण झाल्याने देशातील मोठ्या शहरांची बत्ती गुल झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानमध्ये वीज यंत्रणा निकामी झाली आहे, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोर आणि कराची सारख्या पाकिस्तानातील मोठ्या शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी बिघडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Pakistan suffers major power outage; parts of Islamabad, Lahore, Karachi without electricity for hours
Read @ANI Story | https://t.co/LxEzfM2sie#Pakistan #Pakistanpoweroutage #poweroutage pic.twitter.com/EsiGrqIupF
— ANI Digital (@ani_digital) January 23, 2023
देशभरातील वीज यंत्रणा सध्या प्रभावित झाली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाकिस्तानच्या मीडिया संस्थांनीही कराची, लाहोरमधील अनेक भागात वीज नसल्याचे सांगितले आहे.
के-इलेक्ट्रिकचे प्रवक्ते इम्रान राणा यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये सांगितले की, “शहरातील अनेक भागात वीज खंडित झाल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि तुम्हाला याविषयी माहिती देत राहू” असे नागरिकांना म्हटले आहे.