पाकिस्तानातील “इम्रानराज’ आणि भारत (भाग-२)

प्रा. पोपट नाईकनवरे 
राज्यशास्र अभ्यासक 
पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. निवडणूक निकाल आणि पाकिस्तानातील भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान होणार हे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुलं अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालचा पाकिस्तान कसा असेल आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल याचा आढावा घेणारा लेख… 
2013 मध्ये त्यांनी “नया पाकिस्तान’चा नारा दिला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात त्यांचा बोलबाला वाढू लागला. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवून द्यायचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यात ते यशस्वी झाले.
नवाज शरीफ असोत वा बेनझीर भुट्टो त्यांनी पाकिस्तानात लोकशाही प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. लष्कराचा वरचष्मा मोडून काढायचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनाच नाही, पण पाकिस्तानातील कोणत्याच नागरी नेत्याला हे करता आलेले नाही. भारताकडून वारंवार पराभव पत्करावा लागला.
असतानाही पाकिस्तानच्या लष्कराची लोकप्रियता प्रचंड आहे आणि त्याच जोरावर तेथील लष्कर पाकिस्तानच्या राजकारणात लुडबूड करत असते. पाकिस्तानच्या राजकारणाचा लष्कर हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे लष्कराचे वर्चस्व असलेल्या पाकिस्तानात कधीच लोकशाही सुखाने नांदणार नाही.
आताही तसेच घडणार आहे. पण इम्रान खान यांची कारकीर्द तुलनेने शांततामय असेल. कारण इम्रान खान मुळातच लष्करधार्जिणे आहेत. त्यांना लष्कराच्या हातातील बाहुले असेच संबोधले जात आहे. इम्रान खान यांच्या सत्तेचा मार्ग सुकर व्हावा म्हणून लष्कराने विशेष प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे ते सत्तेवर आल्यानंतर आपल्याला हवे ते निर्णय नागरी सत्तेकडून करवून घेणे पाक लष्कराला सहजशक्‍य होणार आहे. या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांना इम्रान खान नवी झळाळी वगैरे देतील असे समजण्याचे काहीच कारण नाही. उलट आता या दोन देशांतील वैर आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इम्रान खान यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी क्षेत्रातील तालिबानी प्रवृत्तीला जाहीर पाठिंबा दिला होता. दहशतवादी घटकांविषयीचे त्यांचे प्रेम त्यांनी कधीही लपवलेले नाही. त्यामुळे आता काश्‍मीरमध्ये आणखी तीव्र हल्ले होतील याबाबत खात्री बाळगली पाहिजे आणि तशी सज्जता आपली असली पाहिजे.
इम्रान खान पंतप्रधान होण्याचे चिन्हे दिसू लागल्यावर भारतीय लष्कराने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा देऊन आमच्या वाटेला जाऊ नका असे बजावले आहे. पाकिस्तानातील सत्तांतरावर भारतीय लष्कराने बहुधा पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असावी. याचे कारण म्हणजे इम्रान खान आणि दहशतवादी तसेच पाकिस्तानी लष्कर यांचे जिव्हाळ्याचे संबंध हेच आहे. यापुढील काळात काश्‍मीरमध्ये पाकप्रणित दहशतवादी कारवाया वाढतील अशीच भीती व्यक्‍त होत
आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)