जीएसटी संकलन एक लाख कोटीवर जाणार

नवी दिल्ली- प्राप्त माहितीनुसार आक्‍टोबर महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्यावर जाण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठ महिन्यापासून लॉक डाऊनमुळे जीएसटी संकलनावर परिणाम झालेला आहे.
अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अक्‍टोबर महिन्यामध्ये विविध बाजारपेठातील खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे. मॅन्युफॅक्‍चरिंग, सेवा क्षेत्र वेगाने पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यापासून आगामी काळात जीएसटी संकलन वाढण्याची शक्‍यता आहे.
जीएसटी करदात्यांना प्रत्येक महिन्यात कामकाजाचा आढावा जीएसटीआर- 3बी द्वारा सादर करावा लागतो. 20 ऑक्‍टोबर पर्यंत 11 लाख करदात्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 20 ऑक्‍टोबरपर्यंत केवळ 4 लाख 85 हजार करदात्यांनी माहिती दिली होती. यावरून कर संकलन किती वाढणार आहे याचा अंदाज येऊ शकतो.
गेल्या आठ महिन्यांमध्ये कर संकलन 2.35 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्यामुळे केंद्र सरकारला राज्यांना नुकसान भरपाई घेण्यास देण्यासाठी 1.1 लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले होते. 25 मार्चपासून 68 दिवस देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे विविध कारखाने आणि सेवा उद्योग या काळात बंद करावे लागले होते. मात्र आता परिस्थिती वेगाने पूर्ववत होऊ लागली आहे. सप्टेंबर महिन्यातील जीएसटी कर संकलन 95 हजार 480 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
—————-

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.