नेवासा – तिसरी आघाडी तालुक्यात निर्माण करून स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात आपले राजकीय शड्डू ठोकण्यासाठी काही कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधी मतांवर या आघाडीने राजकीय मैदानात तीर मारण्याचा मनसुबा भाजप बरोबरच तिसऱ्या आघाडीकडून आखला जात आहे.
या आघाडीकडे कार्यकर्त्यांची उणीव असतांनाही केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर आणि माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधी मतांवर या आघाडीने राजकीय मैदानात तीर मारण्याचा मनसुबा भाजप बरोबरच तिसऱ्या आघाडीकडून आखला जात आहे.
काही नेत्यांना आता पाच – दहा टवाळखोर एकत्र जमवून राजकीय आखाड्यात आपला मनसुबा सिद्ध करण्याचे वेध लागलेले आहे मात्र राजकारणातील समिकरणे आणि कार्यकर्त्यांचा फौजफाटा नसतांनाही केवळ स्टंट करण्यासाठीच हा मनसुबा असल्याचा दावा आता कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे.
आमदार शंकराव गडाख यांच्या विरोधात भाजप पक्ष हाच एकमेव प्रबळ दावेदार असतांना भाजपातही पक्षांतर्गत कुरघोड्या सुरु झालेल्या असून तिसऱ्या आघाडीनेही आता विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमविण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे. मात्र त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांची उणीव असतांना आमदार होण्याची स्वप्ने आता स्वतंञ नेवासा विधानसभा निवडणुकीच्या राजकीय मैदानात अनेकांना पडू लागल्यामुळे राजकारणाचाच हा पोरखेळ झाला की, काय? असा सवालही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नेवासा तालुक्यातील कित्येक गावात आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना लोक साधे ओळखतही नसतांना केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर हा राजकीय स्टंट आखून प्रयोग करणे कितपत योग्य ठरणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा न्यायनिवाडा होणार असला तरी स्वतंत्र नेवासा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र राजकीय मैदानात सद्यस्थितीत दिसून येत आहे.