नगर: अज्ञात चोराने बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून आतील सामानाची उचकापाचक करत घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 47 हजाराची घरफोडी केल्याची घटना नवनागापुर येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, विजय भिमराज नन्नवरे (वय 30, रा. ओवी अपार्टमेंट, कानिफनाथ मंदिराजवळ, शिवाजीनगर चेतना कॉलनी, नवनागापुर) हे काही कामानिमित्त आपल्या घराला कुलूप लावुन कुटुंबासह बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन आतील सामानाची उचकापाचक करत घरातील 27 हजाराचे सोन्या-चांदीच्या दागिने व 20 हजार रूपये रोख असा 47 हजाराचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विजय नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. लोखंडे हे करीत आहेत.