नागपूर : नागपूरमध्ये अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामागरांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर कंपनीमध्ये जवळपास 30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
आगीमुळे आसपासच्या परिसरामध्ये धुराचे ढग पसरले आहेत. दरम्यान या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.