नागपुरात नितीन गडकरींची 75312 मतांसह आघाडी 

नागपूर – नागपूर मतदारसंघात भाजप उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस नेते नाना पटोले असा सामना रंगला आहे. यामध्ये नितीन गडकरी यांना आतापर्यंत 75312 तर नाना पटोले यांना 43783 मते मिळाली आहेत.

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय आहे. यावरुनच नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी ही लढत प्रतिष्ठेची होणार हे नक्की. खरं तर पटोले यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघ आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळेच काँग्रेसने नाना पटोलेंना नागपूरातून उमेदवारी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.