नागपुरात करोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह

 

नागपूर : नागपुरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 37 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वाढलेल्या आकड्यांमुळे कोविड 19 ची भयावहता अधोरेखित होत आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती पालिकेला कळवण्याचं आवाहन केलं आहे.

नागपुरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी आठ सतरंजीपुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. नागपुरातील सतरंजीपुरामधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा पाच एप्रिलला मृत्यू झाला होता. आतापर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 37 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने नागपुरातील 37 रुग्ण वाढले.

चिंतेची गोष्ट, म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी 144 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कुणी त्या रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास, त्यांनी आपली माहिती लपवू नये, महापालिकेला कळवावी, असं आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.