मुंबईत भरधाव टॅंकरने फुटपाथवरील तिघांना चिरडले

मुंबई – मुंबईच्या विक्रोळी भागात भरधाव टॅंकरने फुटपाथवर झोपलेल्या तिघांना चिरडल्याची धक्कादायक घटना आज उघड झाली. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या एका बालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पार्क साईड पोलिसांनी या प्रकरणी आज “एफआआर’दाखल केली आणि आज सकाळी त्याला अटक करण्यात आली. टॅंकर चालकाच्या विरोधात संबंधित कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. अशोक अलगुरम साहू असे 32 वर्षीय टॅंकर चालकाचे नाव आहे.

विक्रोळीतील टिंबक्‍टू या प्रसिद्ध हॉटेलजवळच रस्त्यालगतच्या फुटपाथवर दोन महिला आणि 15 वर्षांचा मुलगा झोपलेले होते. तेलाचा टॅंकर या भागात पार्क करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि टॅंकर याच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अन्य एका तेलाच्या टॅंकरवर धडकला. या टॅंकरखाली रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेले तिघेजण चिरडले गेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.