ठाण्यात पेट्रोलचे शतक!

मुंबईत 99 रूपये 94 पैसे प्रतिलिटर

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 24 पैशांची, तर डिझेलच्या दरात 29 पैशांची वाढ केली. त्यामुळे ठाणे या महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात पेट्रोल दराने शंभर रूपयांची पातळी ओलांडली. तर, मुंबईत त्या इंधनाचा दर 99 रूपये 94 पैसे इतका झाला आहे.

सार्वजनिक कंपन्यांनी चालू महिन्यात 14 वी इंधन दरवाढ केली. दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही शहरांत पेट्रोल दराने याआधीच शंभरी ओलांडली आहे. त्यामध्ये आता ठाण्याची (100.06 रूपये) भर पडली.

त्या शहरासह मुंबईत डिझेलचा दर 92 रूपयांच्या घरात पोहचला आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 93.84 रूपये आणि 84.61 रूपये इतके झाले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात दोन्ही इंधनांचे दर सर्वांधिक आहेत.

त्या जिल्ह्यात पेट्रोल 104.67 रूपयांवर, तर डिझेल 97.49 रूपयांवर पोहचले आहे. सततच्या दरवाढीमुळे चालू महिन्यात पेट्रोल 3 रूपये 28 पैशांनी, तर डिझेल 3 रूपये 88 पैशांनी महागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.