मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणातील चौकशीत बॉलीवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी सध्य एनसीबीने आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची नुकतीच चौकशी केली.
या दरम्यान “माल, हॅश, वीड’ हे शब्द चांगलेच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सिगारेटला माल म्हटलं जात असल्याचं दीपिकानं चौकशी दरम्यान सांगितलं होत. मात्र, दीपिकाच्या व्यक्त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ‘केदार शिंदे’ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ‘माल’ म्हणजे काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं….
— Kedhar Yeshodhara Shinde (@mekedarshinde) October 1, 2020
केदार शिंदे म्हणाले कि, “अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘माल’ नाही तर, रसिकांचं ‘मोल’ महत्वाचं ठरतं’, असं त्यांनी त्यांच्या म्हटलं आहे.