मालेगाव : नियमांचे पालन करत साजरी केली लोकमान्य टिळकांची जयंती

मालेगाव- प्रखर राष्ट्रवादी, जहालमतवादी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालेगाव शहर शाखेकडून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील स्मारक स्वच्छ करून पुष्प आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी मालेगाव शहरमंत्री कामेश गायकवाड, मालेगाव सहशहर मंत्री स्वराज निकम, किरण परदेशी, सूर्यकांत शर्मा, राहुल पाटील आणि तुषार चौधरी, इ. कार्यकर्ते तसेच मालेगाव शहर विस्तारक सचिन लांबूटे आदी उपस्थित होते.

सबंध परिसर भारत माता की जय, वंदे मातरम आणि लोकमान्य टिळक जिंदाबाद या घोषणांनी निनादून निघाला. तसेच सध्याच्या परिस्थिती ला धरून विद्यार्थी परिषदेने टिळकांच्या चतूःसूत्रीचा (स्वदेशी, स्वराज, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार) अंमल करावा असे, आव्हान स्थानिक नागरिकांना केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.