खेड तालुक्यात मागील 24 तासात 704 जण पॉझिटिव्ह !

राजगुरूनगर : खेड तालुक्यात मागील 24 तासात 704 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात ही धोक्याची बाब आहे.

खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण 165, आळंदी 21, राजगुरूनगर 42 या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 229 जण पॉझिटिव्ह साडपले आहेत. ग्रामीण भागातील आखतुली 1, आंबेठाण 40, आंबोली 1, आसखेड बुद्रुक 2, आसखेड खुर्द 2, आव्हाट 1,  बहिरवाडी 1, बहुळ 5, भांबोली 4, भोसे 9, बिरदवडी 16, बोरदरा 7,  बुुुट्टेवाडी 4, चिंबळी 2, चास 2, चिंचबाईवाडी 1, चिंबळी 8, चिचोशी 4, दावडी 9, धानोरे 4, ढोरे भांबुरवाडी1, होलेवाडी 3, जरेवाडी खुर्द 2, कडाचीवाडी 8, कडधे 2, कडूस 9, कहू 2, काळेचीवाडी 3, काळूस 10, कानेरसर 37, खरोशी 1, केळगाव 1, खालूंब्रे 8, खराबवाडी ८, खरपुडी खुर्द 1, किवळे 1, कोहिंडे बुद्रुक 3, कोयाळी 1, कोये 2, कुरुळी 20, मांजरेवाडी 1, मरकळ 8, मेदनकरवाडी 42, म्हाळुंगे 28 , मोई १, नाणेकरवाडी 25, निघोजे 11, पाईट 2, पाडळी 1, पिंपरी बुद्रुक 7, पिंपरी खुर्द 2, राक्षेवाडी 4, रानमळा 1, रासे 9, रौधळवाडी 1, रेटवडी 5, रोहकल 5, सातकरस्थळ 2, सावरदरी 6, शेलपिंपळगाव 2,शेलू 2, शिरोली 6, शिवे 1, सोळू 3, टाकळकरवाडी 1, तुकाईवाडी 1, वडगाव पाटोळे 2, वाकी बुद्रुक 10, वाकी खुर्द 15 वराळे 3, वरुडे 4, वाशेरे 2, वासुली 5, वेताळे 1 वाडा 3, वाफगाव 1, येलवाडी 1. असे ग्रामीण भागातील 84 गावांमध्ये 476 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

तालुक्यात आतापर्यंत 19478 व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यापैकी 17413 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. तर 235 जणांचे मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात 1241 चाकण 315, आळंदी 100, राजगुरूनगर 174 असे  एकूण 1830 बाधित रुग्ण असून ते कोव्हीड केअर सेंटर व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २४ तासात 137 व्यक्तींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे.

डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले, मागील 7 ते 8 दिवसामधील जे पेंडिग रिपोर्ट होते ते रिपोर्ट आल्यामुळे आजचा आकडा खूपच मोठा दिसतो आहे. अनेकांचा पत्ता, मोबाईल क्रमांक मिळत नसल्याने अनेक रुग्ण ट्रेस होत नाहीत .मृत्यूचे रिपोर्ट न आल्याने आकडेवारी उपलब्ध नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.