खेड शिवापूर – ग्रामीण भागामध्ये थंडीमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे, तसेच दोन दिवस पावसाचा जोर पण होता.
थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काही दुकानांमध्ये उबदार कपडे खरेदीसाठी भागातील नागरिकांची गर्दी होत असून, दिवसाभरापासून ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होतो; पण थंडीची चाहुल लागत नव्हती. मात्र, सोमवारपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट होऊ लागली, त्यामुळे दिवसाही जास्त प्रमाणावर थंडी जाणवत आहे.
या बोचऱ्या थंडीमुळे रात्री उशिरापर्यंत गजबजणारे रस्ते आता लवकर निर्मनुष्य होत आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे सकाळी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची
तारांबळ उडत आहे. एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा आभाळ येत असल्यामुळे विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.