खंडाळा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार मदन भोसले यांनी वाई विधानसभा मतदारसंघात “संवाद व सेवा पंधरवडा’ आयोजित केला असून त्यानिमित्ताने आज दि. 20 रोजी खंडाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद यात्रेचा शुभारंभ लोणंद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पार पडला. लोणंदमधील स्वागतानंतर दौऱ्याची सुरुवात झाली.
भादे येथे शाखा उदघाटन, खेड बुद्रुक, म्हावशी येथे वृक्षारोपण, बावडा येथे गण बैठक, तिथून शिवाजीनगर, तसेच नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारकास भेट, शिरवळ येथे गण बैठक व पळशी, विंग येथे कार्यकर्त्यांना भेटी असे कार्यक्रम झाले. देशात व राज्यात भाजपचे सरकार असून भाजप कार्यकर्त्यांना योग्य व सामाजिक कामांत पूर्ण बळ दिले जाईल तसेच जिल्ह्यात भाजपच एक नंबरचा पक्ष बनण्यासाठी जे काही करावे लागेल ते करू, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले. यावेळी एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी, आनंदराव शेळके- पाटील, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, महिला आघाडी अध्यक्षा गीतांजली क्षीरसागर, नगरसेविका दीपाली शेळके, युवा नेते ऋषीकेश धायगुडे, हर्षवर्धन शेळके, लोणंद शहर व पंचक्रोशीतील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.