कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कॉंग्रेस जाहीर करणार नाही

नवी दिल्ली  – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही असे केंद्रीय कॉंग्रेस नेतृत्वाने कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांना स्पष्ट केले आहे असे सांगण्यात येत आहे.

कर्नाटक विधीमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते सिद्धरामैय्या आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते.

सर्वांनी एकजुटीने ही निवडणूक लढवणे महत्वाचे आहे असे या नेत्यांना सांगण्यात आले. सिद्धरामैय्या आणि शिवकुमार यांच्यात या पदासाठी आत्तापासूनच स्पर्धा सुरू झाली असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या आहेत. पण सिद्धरामैय्या यांनी याचा इन्कार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.