करीना कपूर टिव्हीवरील “रिऍलिटी शो’ मध्ये

मुंबई – करीना कपूरच्या “गुड न्यूज’ या सिनेमाबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. या सिनेमातून करीनाचा मुलगा तैमूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या पुढे यायला लागल्या आहेत. तिच्या सोबत अक्षय कुमार असणार आहे. दरम्यान सलमान, शाहरुख आणि आमिर पाठोपाठ आता करीनानेही टिव्हीवर पदार्पण करणार आहे. एका डान्स “रिऍलिटी शो’ची जज म्हणून काम बघण्यास तिला विचारण्यात आले आहे. त्यासाठी करीनाने खूप मोठी रक्कम मानधन म्हणून मागितली आणि चॅनेलने तिची ही मागणी मान्यही केले असल्याचे समजते आहे. करीनाने या चॅनेलबरोबर 2-3 मिटींग्जही केल्या आहेत. “डान्स इंदिया डान्स’च्या पुढच्या सत्राची जज म्हणून करीना दिसण्याची शक्‍यता आहे. ही अजून नुसती चर्चाच आहे. अद्याप चॅनेल किंवा करीना कोणाकडूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या रिऍलिटी शोमध्ये कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस जज म्हणून निश्‍चित आहे. जर करीनाने या “रिऍलिटी शो’ चे जज म्हणून काम स्वीकारले तर टिव्ही शो साठी सर्वाधिक मानधन घेणारी ती ऍक्‍ट्रेस ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.