पिंपरी, दि. 23 – पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने अवघ्या सातव्या वर्षी मेहनत व कष्टाच्या जोरावर सायकलवरून सलग 51 किलोमीटरचा प्रवास करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे. रिआन देवेंद्र चव्हाण असे या चिमुकल्या विक्रमवीराचे नाव आहे. रिआन याचे वडील देवेंद्र चव्हाण हे पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर तर आई डॉ. अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र, पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.
रिआनने त्याच्या सातव्या वाढदिवशी हा पराक्रम केला. या पराक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. रिआन हा केंद्रीय विद्यालय, देहूरोड नंबर – 1 या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत आहे. रिआनचा लहानपणापासून साहसी खेळाकडे कल झुकलेला आहे. अवघा तीन वर्षाचा असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले त्याने सर केले. याशिवाय घरालगतचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडीवरही तो नेहमी टेक करत असतो. रिआनला
मॅरेथॉनमध्येही आवड आहे. त्याने पाच किलोमीटरच्या सहा मॅरेथॉन पूर्ण
केलेल्या आहेत. पिंपरी – चिंचवड येथील पाच किलोमीटर मॅरेथॉन त्याने 34 मिनिटात पूर्ण केलेली आहे. स्पोर्टस फोर ऑल 2022 या आठ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत 50 मीटर मॅरेथॉनमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळविले आहे.
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय