अबब ! भारतात ‘ही’ भाजी मिळते चक्क 30 हजार रुपये किलो; आहे खूपच ‘गुणकारी’

तुम्ही भाजीपाल्यावर किती पैसे खर्च करू शकता? अगदी मोठ्यात मोठ्या परिवारासाठी पाचशे किंवा जास्तीतजास्त हजार रुपयांपर्यंतची भाजी खरेदी होऊ शकते. पण, तुम्हाला जर कुणी 25 ते 30 हजार रुपये किलोची भाजी घ्यायला सांगितली तर तुम्ही त्याला वेड्यात काढणार !

या भाजीची किंमत पाहून तुम्ही थट्टा करुन नक्की म्हणाल की ही भाजी खायची असेल तर बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. होय, अशी भाजी चक्क आपल्या भारतातच पिकते आणि विकलीसुद्धा जाते. ही अत्यंत महागडी भाजी म्हणजे ‘गुच्छी’ !

वास्तविक ही भाजी हिमालयात आढळणारी वन्य मशरूम प्रजाती आहे. बाजारात त्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये किलो आहे. गुच्छी ही एक दुर्मिळ भाजी आहे जिला विदेशात चांगली मागणी आहे.

या भाजीत आढळणारे औषधी गुणधर्म हृदयरोगांपासून मुक्त होतात. याशिवाय ही भाजी शरीराला इतर अनेक प्रकारचे पोषण देते. गुच्छी ही एक प्रकारची मल्टी-व्हिटॅमिन नैसर्गिक गोळीच आहे. ही भाजी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उपलब्ध होते, जी मोठ्या कंपन्या आणि हॉटेल्स खरेदी करतात.

अमेरिका, फ्रान्स, युरोप, स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये लोकांना गुच्छीची भाजी खायला आवडते. तथापि, ही वन्य भाजी गोळा करण्यासाठी जीव धोक्यात घालून डोंगरावर जावे लागते. ही भाजी पावसात साठवून वाळविली जाते, त्यानंतर ती वापरली जाते.

पाकिस्तानच्या हिंदुकुश पर्वतांवरही गुच्छी वाढते. पाकिस्तानातले लोकही सुकवून परदेशात विक्री करतात. या भाजीबद्दल बर्‍याच वदंता आहेत. असे म्हणतात की जेव्हा वादळ पर्वतांवर आदळले आणि त्याच वेळी वीज कोसळली तर तेव्हा गुच्छीचे पीक तयार होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.