-->

इंदापूर तालुक्यात एकाच दिवसात 10 कोरोनाबाधित !

इंदापूर शहरात पुन्हा कोरोनाची दहशत

रेडा : इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा एकाच दिवसात 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर यापैकी इंदापूर शहरात 5 कोरोनाबाधित सापडल्यामुळे तालुक्याचा ग्रामीण भाग व इंदापूर शहरावर पुन्हा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

तालुक्यातील प्रशासनाने खूप मोठी मेहनत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतली असताना देखील कोरोनाबाधित मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा योग्य निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, 42 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 10 नागरिकांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदापूर नगरपरिषदेने मागील दोन-तीन महिन्यामध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर शहर संपूर्णपणे बंद ठेवून शहरात येणारे रस्ते पूर्णपणे बंद केले होते. मात्र लॉकडाउन शिथील केल्यामुळे पर जिल्ह्यातून इंदापूर शहरात येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे पूर्ण शहरात वर्दळ वाढली असून व्यापारी पेठ खुली झाल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढले. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उत्तम नियोजनाचे पाऊल उचलावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

इंदापूर शहरातील दत्तनगर,राऊत नगर या भागात पाच रुग्ण,भिगवण येथे 3 रुग्ण,अकोले गावात 1 रुग्ण, तर लासुर्णे गावात 1 रुग्ण असे एकूण 10 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. अशी माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी व शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.