हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील स्थानिक निवडणुकीमध्ये लोकशाही समर्थक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रविवारी काळ्या कपड्यांमधील हजारो आंदोलकांचा समुदाय रस्त्यावर उतरला होता. तसेच आंदोलक आणि पोलिस यांच्यात वाढत्या हिंसक संघर्षाचा पुन्हा प्रारंभ झाला, तसेच अधिकाऱ्यांनी मुलांसह गर्दीवर मिरची स्प्रे आणि अश्रुधुराचा मारा केला.
हॉंगकॉंगमधे पोलिस बळाचा जास्त वापर – मिशेल बॅशलेट
हॉंगकॉंगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिस बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, बॅशलेट यांची देशाच्या अंतर्गत व्यवहारात अनुचित हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत चीनने ही मागणी फेटाळून लावली आहे.
जिनिव्हामधे नियुक्त चीनच्या शिष्टमंडळानं म्हटले आहे की, बॅशलेट यांचा “साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्रातला लेख चुकीचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतल्या तत्वांचे उल्लंघन करणारा आहे.
24 नोव्हेंबरच्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकारवर दबाव आणण्यासाठी काढण्यात आलेल्या तीन मोर्च्यांपैकी मुख्य मोर्चा सिम शा त्सुई जवळच काढण्यात आला होता. सरकार अद्याप आमचे ऐकत नाही म्हणून निषेध सुरूच राहू, ते थांबणार नाहीत. काय होईल हे सांगणे कठीण आहे. परंतु लोक अजूनही संतप्त आहेत आणि त्यांना बदल हवा आहे, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
परंतु मोर्चातील काही निदर्शक पोलिसांच्या वसाहतीमध्ये शिरला तेव्हा निदर्शकांना परत फिरण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी परवानगी दिलेल्या मार्गावरून भटकत असल्याचे बजावले. प्रथम मिरची स्प्रे आणि नंतर बऱ्याच ठिकाणी अश्रुधुराचा मारा करण्यात आला, एका ठिकाणी आंदोलकांवरील गोळीबारात रस्त्यवरील शीतपेये विक्रेता जखमी झाला.