हरियाणामध्ये 3 लाख शेतकऱ्यांना भाजप बिनव्याजी कर्ज देणार

नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणे हरियाणामध्येदेखील 21 ऑक्‍टोबर रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्‍वभूमिवर रविवारी भाजपकडून जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर अनुसुचित जातीच्या 3 लाख नागरिकांना तारणाशिवाय तर राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्‍वासन भाजपकडून देण्यात आले आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या जाहीरनाम्याविषयी माहिती दिली. गरीब वर्गातील मुलींना सरकार मोफत शिक्षण तसेच राज्यातील 25 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार असून यासाठी 500 कोटीची योजना आखण्यात आली असल्याचेही भाजपने म्हटले आहे.

राज्याला क्षयरोगमुक्‍त करण्यात येईल तसेच वृद्धांना 3 हजार पेन्शन देण्यात येणार असल्याचे सांगत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे नड्डा यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिल्याने शेतकऱ्यांचा मुद्दा राजकिय पक्षांना महत्वाचा बनला असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.