गुजरातमध्ये ‘आप’ भाजपसाठी नव्हे, तर कॉंग्रेससाठी आव्हान : रूपानी

अहमदाबाद,   – आम आदमी पक्ष (आप) हा गुजरातमध्ये भाजपसाठी नव्हे; तर कॉंग्रेससाठी आव्हान म्हणून पुढे आला आहे, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी बुधवारी म्हटले.

गुजरातमधील सहा पालिकांच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भाजपने सर्व पालिकांची सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवले. मात्र, सुरतमधील निकाल चर्चेचा विषय ठरला. त्या शहरातील पालिकेच्या 120 पैकी 93 जागा भाजपने खिशात घातल्या. पण, उर्वरित 27 जागा जिंकत आप त्या पालिकेमधील प्रमुख विरोधी पक्ष ठरला. याआधी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. सुरतमध्ये लक्षणीय कामगिरी करत आपने गुजरातच्या राजकारणात खऱ्याअर्थी एन्ट्री केल्याचे मानले जात आहे. ती बाब भाजपच्या दृष्टीने एक राजकीय आव्हान असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर रूपानी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सुरत पालिकेच्या याआधी कॉंग्रेसकडे असणाऱ्या जागा आपने जिंकल्या. त्यामुळे आप हा कॉंग्रेसचा पर्याय बनला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.