गोव्यात कॉंग्रेसची जीएफपीशी आघाडी

पणजीे  – गोव्यात फेब्रुवारी 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून त्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाची गोवा फॉर्वर्ड पक्षाशी आघाडी झाली आहे अशी माहिती त्या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी दिली.

अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे गोवा शाखेचे निरीक्षक दिनेश गुंडुराव यांनी या दोन पक्षांच्या आघाडीला पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली आहे अशी माहिती आपल्याला दिली आहे असे सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की दोन्ही पक्षांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता आम्ही जागा वाटपाविषयी चर्चा करून तो निर्णय लवकरच निश्‍चीत करू. गोवा फॉर्वर्ड पक्षाचे गोवा विधानसभेत सध्या तीन आमदार आहेत. कॉंग्रेसकडे सध्या एकूण पाचच आमदार उरले आहेत. चालू विधानसभेत कॉंग्रेसला एकूण 19 जागा मिळाल्या होत्या पण त्यांचे 12 आमदार भारतीय जनता पक्षात गेले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.