पुणे – घोरपडी गाव भाजी मंडई जवळ असणाऱ्या नाल्यामध्ये संध्याकाळी एक इसम (वय 55) सुमारे पंचवीस फुट खाली पडला होता. पुणे कॅन्टोमेंटचे जवान महेंद्र महामुनी यांनी नाल्यात उतरुन त्या इसमास वर आणत शिडीच्या साह्याने सुखरुप बाहेर काढले.
या कामगिरीत ड्रायव्हर इमरान तांबोळी, तांडेल दिपक बद्दलवार, फायरमन अभिजीत घुमटकर, महेंद्र महामुनी, सिद्धी गिलबिले, पंकज रसाळ, अजय इथापे यांनी सहभाग घेतला.