Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड सध्या खंडणीप्रकरणात अटकेत असून त्याच्याबद्दल दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच आता वाल्मिक कराडचे पुणे कनेक्शन समोर आले आहे.
वाल्मिक कराडने दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस घेतले आहे. या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी केली. माजी नगरसेवक दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते. याशिवाय वाल्मिकने ज्योती मंगल जाधवच्या नावावर पुण्यात जमीन खरेदी केली. या जमीनीच्या व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली आहे. Santosh Deshmukh Murder Case |
दत्ता खाडे काय म्हणाले?
सीआयडी चौकशीनंतर दत्ता खाडे म्हणाले की, “वाल्मिक कारडचे आणि माझेही संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलवलं होतं. माझी चौकशी झाली असून जी काही उत्तर द्यायची आहेत ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते तेव्हा माझी वाल्मिकसोबत तोंड ओळख झाली. वाल्मीक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही.” Santosh Deshmukh Murder Case |
कोण आहेत दत्ता खाडे ?
दत्ता खाडे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत. 2007 मध्ये दत्ता खाडे हे भाजपच्या तिकिटावर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2012 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेविका होत्या. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दत्ता खाडे यांच्यावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी होती.
वाल्मिक कराडची पुण्यात करोडो रुपयांची संपत्ती
वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे. पुण्यामध्ये त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे आणि स्वतःच्याही नावे त्याने संपत्ती खरेदी केली आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडने दुसऱ्या पत्नीच्या नावे ऑफिस विकत घेतले आहेत. हडपसरमध्ये कोटयावधी रूपये किमंतीच्या सदनिकाही कराड याने विकत घेतल्या आहेत. पिंपरी चिचंवडमध्येही कराड यांच्या कोटयावधी रूपये किंमतीच्या सदनिका आहेत.
वाल्मिक कराडची सुनावणी पुढे ढकलली
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे संशयित म्हणून वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या सोबतच वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. यावर काल न्यायालयात सुनावणी होती. ही सुनावणी आता 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. Santosh Deshmukh Murder Case |
हेही वाचा:
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती