समोर रबडी, कुल्फी आहे पण… – फडणवीस

पिंपरी – समोर विविध खाद्यपदार्थांचे फलक लावलेले आहेत. त्यामध्ये कुल्फी, रबडीचा समावेश आहे. ते सर्व स्टॉल्स आम्हाला खुणावत आहे. मात्र त्या स्टॉल्सकडे जाऊ शकत नाही कारण आपल्याला डायटिंग करायचे आहे. महेश लांडगे यांनी कुस्तीच्या माध्यमातून शरीरयष्टी कमावलेली आहे. मात्र मला डायटिंग करावेच लागेल, असा मिष्कील टोला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजंली मंचच्या वतीने संयोजिका पूजा लांडगे यांनी भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. 30) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, संजय भेगडे, संयोजिका पूजा लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.