दुखापत खरी की, भूपतीचे गुडबुक दिसले

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून रोहन बोपण्णाची माघार

नवी दिल्ली: परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी होत असलेल्या डेव्हिस करंडक टेनिस लढतीत अनुभवी रोहन बोपण्णाने खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र त्याची दुखापत इतकी गंभीर आहे का, टेनिस संघटनेवरील नियंत्रण कमी होत चाललेल्या भूपतीच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी हा निर्णय घेत आहे, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

एमआरआय स्कॅन केल्यानंतर बोपण्णाने या लढतीतून माघार घेत असल्याचे भारतीय डेव्हिस संघाचा कर्णधार रोहित राजपालला कळविले. भारत पाकिस्तान यांच्यात 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी डेव्हिस करंडकाचे सामने होणार आहेत. या लढतीत लिअँडर पेस बोपण्णासह दुहेरीत खेळणार असल्याचे बोलले जात होते.

भारतीय टेनिस संघटनेवर महेश भूपतीचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. तसेच त्याचे पेसशी असलेले संबंध खूपच बिघडले आहेत. त्यामुळेच भूपतीच्या गुडबुकमध्ये असलेल्या खेळाडूंनी यापूर्वी देखील पेससह खेळण्यास नकार दिला होता हा इतिहास आहे. आता या लढतीत पेस सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तर बोपण्णाने हा निर्णय घेतलेला नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

पाकिस्तानची याचिका फेटाळली                                                                                           भारताविरुद्धच्या डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेचे सामने सुरक्षेच्या कारणामुळे अन्यत्र हलविण्याच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडे करण्यात आलेली पाकिस्तानची फेरविचार याचिका फेटाळण्यात आली आहे. हे सामने कझाकिस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे होतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.