चोवीसावाडी येथे सोयाबीन दिले पेटवून

आळंदी- येथून जवळच असलेली चोवीसावाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीन अज्ञाताने पेटऊन दिला. याचा पंचनामा करण्यात आला असून पंचनाम्यानुसार शेतकऱ्याचे सुमारे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मोराजी सदाशिव भिवरे (वय 76) या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की, भिवरे यांनी ओल्या दुष्काळाशी सामना करीत थोडेफार हाताला लागेल एवढे नगदी पीक सोयाबीन आपल्या शेतात साठवून ठेवले होते. दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी रात्री कोणीतरी हे सोयाबीन पेटऊन दिल्याने भिवरे हताश झाले आहेत. याबागत त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या घटनेचा पंचनामा चऱ्होली बुद्रुक येथील तलाठ्यांनी मंगळवारी (दि. 3) केला.

Leave A Reply

Your email address will not be published.