चीनमध्ये लष्कराला तब्बल 40 टक्‍के पगार वाढ

बीजिंग – चीन सरकारने आपल्या लष्कराला यंदा तब्बल चाळीस टक्‍के पगारवाढ जाहीर केली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा अध्यक्ष शी जिपिंग यांचा प्रयत्न असून याच प्रयत्नांचा भाग म्हणून ही वेतनवाढ त्यांना देऊ करण्यात आली आहे.

या वेतनवाढीचे वृत्त हॉगकॉंग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे. चीनने अलीकडेच आपल्या नॅशनल डिफेन्स कायद्यांमध्ये बदल करून जिपींग यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती लष्करी आयोगाला जादा अधिकार दिले आहेत.

संपूर्ण चिनी लष्कर या आयोगाच्या अखत्यारीत आणण्यात आले आहे. नवीन कायद्यानुसार या आयोगाला चीनच्या आधुनिकीकरणासाठी देशातून व विदेशातून निधी जमवण्याचा अधिकार मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.