पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. ज्योती भाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. विजय खरे यांच्याकडून डॉ. भाकरे यांनी प्रभारी कुलसचिव पदाची सूत्रे स्वीकारली.
विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या कुलसचिव पदाच्या परंपरेतीत त्या दुसऱ्या महिला प्रभारी कुलसचिव बनल्या आहेत.
डॉ. ज्योती भाकरे या विद्यापीठातील विधी विभागातील प्राध्यापिका आहेत. त्यांनी आरोग्य कायदा या विषयात पीएच. डी केली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या विद्यापीठात ज्ञानदानाचे काम करत आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, विद्यापीठाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.