स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्यास दहा वर्षे सक्तमजुरी

बीड: राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पटेकरला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने डॉ. मुंडे दाम्पत्याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता, असे मत नोंदवत सर्व दोषींना 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

परळीत मे 2012 मध्ये सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्हा न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडेसह अन्य आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सदर आरोपी साडे सहा वर्षापासून कारागृहात आहेत. त्यांचा न्यायालयीन बंदी काळ वजा केला जाणार आहे. म्हणजे आणखी साडे तीन वर्षे या आरोपींना शिक्षा भोगावी लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी कलम 304, 312, 314, 315 आणि 316 नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्‍शन 3A, सेक्‍शन 9, सेक्‍शन 17, सेक्‍शन 29 नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्‍शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला आहे.
दरम्यान, 2015 मध्ये परळी कोर्टाने मुंडे दाम्पत्याला वेगवेगळ्या आठ कलमांखाली प्रत्येकी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. म्हणजे एकूण 48 महिन्याची शिक्षा सध्या सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे भोगत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)