नागपुरात अमानुष मारहाण प्रकरणी युवा सेनेच्या नेत्यासह पाच अटकेत

नागपुर – नागपूरच्या वडधामना परिसरात विक्की आगलावे या ट्रक चालकाला अमानुष मारहाण करणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यासह इतर चार सहकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील एका ट्रक चालकाचा अमानवीय छळ करत त्याला जबर मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेतील पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. शिवसेनेनेही या प्रकाराला आक्षेपार्ह म्हणत मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अखिल पोहनकर, अमित ठाकरे, प्रकाश चवरे, श्रीराम इकनकर आणि चंद्रशेखर परसमोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ट्रक चालकाला मारहाणीचा व्हिडीओ नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला. त्यानंतर पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)