सुरक्षा नियम न पाळणारे व्यावसायिक कचाट्यात

महापालिकेची आजपासून तपासणी मोहीम

पुणे – सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून त्यांच्याकडून बुधवारपासून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहरांतील दुकानांमध्ये तसेच मॉलमध्ये सोशल डिस्टिसिंग पालन न होणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, यासारख्या तक्रारी वाढत असून त्यासाठी कारवाई करण्यास अतिक्रमण आणि घनकचरा निमर्लून विभागाचे कर्मचारी व्यावसायिकांवर कारवाई करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.