प्रभात वृत्तसेवा – सातत्याने कोरोनाचा मार झेलत असलेल ब्रिटन सध्या एका नवीन नियमामुळे जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीला आटोक्यात आणण्यासाठी आणि देशाला लॉकडाऊन पासून वाचविण्यासाठी ब्रिटन एक नवीन नियम केला आहे. या नवीन नियमामुळे ब्रिटन सरकारने प्रत्येक तरुणाने आठवडय़ातून दोनदा कोरोना टेस्ट करण्यास सांगितले आहे. सरकारला आशा आहे की, पटपट कोरोना टेस्ट केल्याने कोरोनाने संक्रमित असलेल्या लोकांची योग्य वेळेत ओळख पटण्यास मदत होईल.
लक्षण नसलेल्या रुग्णांची होणार ओळख
डेली मेलच्या बातमीनुसार, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरस ट्रॅकिंग सिस्टममध्ये सुधारणा केली जात आहे. या नुसार नियमितपणे प्रत्येक तरुणाला आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. कारण ब्रिटनला लॉकडाऊन पासून सुटका मिळेल. आरोग्यच्या विशेष तज्ज्ञांचे म्हणने आहे की, हे पाऊल उचलल्यामुळे लक्षण नसलेल्या रुग्णांना ओळखण्यास मदत होईल. सरकार यासाठी एक मोहीम राबवत आहे.
ब्रिटन मध्ये सर्व निर्बंध सहा महिन्यासाठी वाढविण्याच्या नियमावर अगोदरपासून वाद सुरू आहेत. या व्यतिरिक्त व्यापक पातळीवर लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. आणीबाणी लागू करण्यासाठी सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.मात्र विरोधी पक्ष या विरोधात उतरले आहेत. विरोधीपक्षाच्या खासदारांनी इशारा दिला आहे की, हळू हळू लॉकडाऊन कमी केल्याने सरकारच्या लसीकरण अभियानाला धक्का बसू शकतो.
कोविड रिकव्हरी ग्रुपचे प्रमुख बेकर म्हणाले, ‘ते सरकारच्या शक्ति वाढवण्याच्या प्रस्तावा विरुद्ध मतदान करणार आहेत . पब्लिक हेल्थ इंग्लंडचे डॉ मैरी रामसे यांनी इशारा दिला आहे की, हे खूप महत्वाचे आहे की, आपण मास्क घालणे आणि सोशल डिसटन्स पळावे आणि दुर्लक्ष न करता हे पुढे चालूच ठेवावे.’