बिहारमध्ये मुख्यमंत्री ‘नितीश कुमार’च !

गृहमंत्री अमित शाहने यांनी केली जाहीर घोषणा

पाटणा – बिहारमधील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांच्यात युती झाली असून या युतीत कोणत्याही पक्षाच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार हेच राहतील, अशी जाहीर घोषणाच गृहमंत्री अमित शाह यांनी वृत्तवाहिनी  बोलताना केली.

काय म्हणाले अमित शाह 

‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत. जरी भाजपाने जदयूपेक्षा जास्ता जागा मिळवल्या तरीही’

तत्पूर्वी, महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवल्यानंतरही शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर अडून राहिल्याने भाजपाचे सत्तेचे स्वप्न भंगले होते. याची बिहारमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपाने विशेष काळजी घेतली आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जेडीयूच्या जागा कमी करण्यासाठीच लढत आहोत, असे निवेदन लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी हे प्रतिपादन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.