भवानीनगरात पावसाची उघडीप, टक्‍का वाढला

भवानीनगर- बारामती व इंदापूर तालुक्‍यात गेली तीन दिवस सलग पाऊस पडत असतानाही मतदानाची चिंता सतावत असताना आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी उस्फूर्तपणे मतदान केले.

बारामती व इंदापूर मतदारसंघात सलग तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु आज मतदानादिवशी सकाळपासून पाऊस आला नाही. त्यानंतर दुपारी ऊनही पडले होते. त्यामुळे मतदार घरातून उत्स्फूर्त बाहेर पडले. विशेषत: महिलांनीही रांगा लावून मतदान केले. आज मतदानादिवशी पाऊस न आल्याने मतदानाच्या टक्‍केवारीत वाढ झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)