जळोची – बारामती तालुक्यात काल आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणि काही लक्षणे आढळलेल्या अशा ६३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
त्यापैकी ५२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर अजून १० जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दि. १३ रोजी तालुक्यातील २४ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यातील एक अहवाल प्रतीक्षेत ठेवण्यात आला होता तो अहवाल देखील निगेटीव्ह आला आहे.