बारामती – तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या एका २० वर्षीय युवतीने कॉलेजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शरयू संदिप रणवरे वय.२० वर्षे,( रा.वडापुरी,ता.इंदापुर,जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. शरयूने रात्री साडेअकरा ते बारा च्या सुमारास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत. या युवतीने नेमकी का आत्महत्या केली ? याचा खुलासा लवकरच पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. यामुळे आता या आत्महत्येमुळे नागरिकांत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.