अफगाणिस्तानात 11 पोलिसांसह 21 जण ठार

काबुल : अफगाणिस्तानातील बागलान प्रांतातील एका चेकपोस्टवर तालिबानी गनिमांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात 21 जण ठार झाले त्यात 11 पोलिस जवानांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर चेकपोस्टमध्ये तैनात ठेवण्यात आलेली सर्व शस्त्रे तालिबानी गनिमांनी पळवून नेली. या गोळीबारात पाच पोलिस जखमी झाले असून त्यांची प्रकृतीही अत्यवस्थ आहे.

समनगन प्रांतातही तालिबानी गनिमांनी दुसरा मोठा हल्ला केला त्यात दहा नागरीक ठार झाले आहेत. सरकारच्या बाजूने लढणाऱ्या गनिमांच्या अड्ड्यावर हा हल्ला करण्यात आला. तेथे अन्य चार जण जखमी झाले आहेत. तालिबानी गनिमांनी एकीकडे अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता चर्चा सुरू केली असली तरी त्यांनी अफगाणिस्तानातील आपले हल्लेही कायम सुरू ठेवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)