एकाच दिवसात वाघोलीतील १८ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह

एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ७८ ; २४ रुग्ण झाले बरे ; ५४ रुग्ण अ‍ॅक्टीव

वाघोली (प्रतिनिधी): वाघोलीतील कोरोना रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून एकाच दिवसामध्ये १८ कोरोनाचे विक्रमी रुग्ण पॉजिटीव्ह सापडले आहेत. वाघोलीतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ७८ झाला आहे. यापैकी २४ रुग्ण बरे झाले आहेत तर ५४ रुग्ण अ‍ॅक्टीव आहेत.

१५ एप्रिल रोजी वाघोलीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील नऊ दिवसामध्ये कोरोनाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊन ७८ रुग्ण झाले आहेत. एकाच दिवसात १८ रुग्ण पॉजिटीव्ह आल्याने वाघोलीकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, स्वच्छता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सुरुवातीच्या काळात वाघोलीत कोरोनाचे १८ रुग्ण सापडण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी लागला होता आता एका दिवसातच १८ कोरोनाचे रुग्ण सापडू लागले असल्याने कोरोनाचा सामाजिक संसर्ग कित्येक पटीने वाढला आहे. संसर्गाचा वेग थांबविण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.