भूमी पेडणेकरने फारच थोड्या कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. अत्यंत हटके सिनेमांची निवड करून तिने आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. तिच्या व्यावसायिक यशाबरोबरच आणखी एका गोष्टीने आता प्रेक्षकांना तिची दखल घ्यावी लागणार आहे. अभिनेता जॅकी भगनानीबरोबर तिचे अफेअर सुरू असल्याचे समजते आहे.
जॅकी भगनानी आणि भूमी यांना बऱ्याच वेळा एकत्र बघितले गेले आहे. मध्यंतरी ते दोघे मुंबईमध्ये एकत्र फिरताना आढळले होते. ते ज्या कारमधून फिरायला गेले होते, ती कार भूमीच्या मालकीची नव्हती. त्यामुळे त्यांच्यातील डेटिंगच्या गॉसिपबाबत जरा जास्तच चर्चा झाली.
भोपाळमध्ये शुटिंग दरम्यान भूमी “कोणाला तरी भेटायचे आहे,’ असे सांगून निघून गेली होती. तिला तिच्या भेटीबाबत खोदून खोदून विचारले असता. “माझे अफेअर आहे. पण ते माझ्या कामाबरोबर आहे.’ असे भन्नाट उत्तर तिने दिले होते. भूमीबरोबर “दम लगा के हैय्या’मधील सहकलाकार आयुष्मान खुरानाने मात्र तिचे गुपित फोडलेच. तिला डेटिंग आवडते आहे.
तिने कोणाबरोबर डेटवर जायला आवडेल हे देखील आपल्याला सांगितले असल्याचेही आयुष्मानने सांगून टाकले. एवढे सांगितल्यावर “तो’ कोण हे ओळखायल गॉसिप गॅंगला वेळ लागणार नव्हता.
भूमी आणि जॅकी भगनानी या दोघांना अद्याप आपले रिलेशन जगासमोर आणायची इच्छा नाही. व्यावसायिक फ्रंटवर “सांड की आंख’, “पती पत्नी और वो’,”बाला’,”डॉली किटी और वो चमकते सितारे’ आणि “भूत पार्ट 1: द हॉंटेड यासारखे सिनेमे आहेत “सांड की आंख’ आणि “पती पत्नी और वो’ या दोन सिनेमांचे शूटिंग सध्या वेगात सुरू आहे. ते रिलीज झाल्यानंतरच भूमी आपल्या रिलेशनशिपबाबत थोडे जास्ती सक्रिय होऊ शकेल.