जळगावः काल झालेल्या जळगाव रेल्वे अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. या रेल्वे अपघाताच्या दुर्घेटनेत १३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मृत्यूमूखी पडलेले बहुतांश जण हे परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वेला आग लागली असल्याची अफवा पसरली आणि क्षणातच होत्याच नव्हत झालं. पुष्कक एक्सप्रेस या रेल्वेतील प्रवाशांनी उड्या मारल्या. यावेळी बाजूच्या रेल्वे रुळावरून जाणाऱ्या रेल्वेने या प्रवाशांना धडक दिली. ही आगची अफवा एका चहा विक्रेत्याने दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची नेपाळी कुटुबांतील तरुणीने दिलेली माहिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. राधा रमेश भंडारी (वय २९) ही तरुणी तिची सासू कमला नबीन भंडारी (वय ४९) नेपाळहून लखनऊ उत्तर प्रदेश येथे आले. हे कुटुंब मूळचे नेपाळ देशातील रहिवासी आहे. लखनऊ स्थानकावरून पुष्पक एक्सप्रेस या रेल्वे गाडीत हे कुटुंब प्रवास करत होते. बुधवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास गाडीने जळगाव स्थानक सोडले. काही अंतरावर असलेल्या माहेजी-पाचोरा दरम्यान गाडीच्या प्रेंटीकारमध्ये आग लागल्याच्या अफवेने गोंधळा उडाला. यावेळी प्रवाशांनी रेल्वे थांबवण्यासाठी चैन ओढली आणि रेल्वेतून उड्या घेतल्या.
सून पुरती भेदरली
यामध्ये या कुटुबांतील सदस्यांनी देखील रेल्वेतून उड्या मारल्या. त्यात मोईश्वरा विश्वकर्मा, जेन नदा विश्वकर्मा आणि राधा यांचा मुलगा खाली उतरले. रेल्वे रुळावर धावपळ उडाल्याने सर्वजण सैरभर पळत सुटले. यावेळी त्यांच्या सासू बाजूच्या रेल्वे रुळावरून जात असलेल्या कर्नाटक एक्सप्रेस खाली आल्या आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर भेदरुन गेलेली सून आपल्या सासूचा शोध घेण्यासाठी धावपळ करत होती. यावेळी अनेक मृत्यूदेह रेल्वे रुळावर रक्त्याच्या धारोळ्यात पडले होते.
शर्टाच्या तुकड्यावर ओळख पटली
या मृतदेहांमध्ये एक टी शर्टमध्ये तुकड्यात पडलेला मृतदेह आढळला. त्याला मुंडके नव्हते. या टी शर्टवरून सूनेने आपल्या सासूची ओळख पटवली. सासूचा मृतदेह पाहून सूनेच्या अंगातल अवसानच गळून पडलं. हे शीर घेऊन इकडून तिकडून ते रेल्वे रुळावरून पळत राहिले. अखेर विना शिराचा मृतदेह घेऊन त्यांना रुग्णवाहकेत टाकून जळगावात आणण्यात आले. मयत कमला भंडारी या नेपाळी महिला असून मुंबईतील कुलाबा भागात त्या स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या.