ओळख पटवण्यात चूक; इराकमध्ये काश्‍मिरीला नाहक कारावास

बगदाद : ओळख पटवण्यात झालेल्या चुकीमुळे एका 51 वर्षीय काश्‍मिरी नागरीकाला इराकमध्ये एक महिनाभर कारावासात काढावा लागला. मात्र याबाबत इंटरपोल किंवा इराकी प्रशासन यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी देखील घेतली नाही.

एक महिना कारागृहात काढल्यानंतर काश्‍मिरी नागरिक नासीर अहमद दर याला इराकमध्ये अटक करण्यात आली. श्रीनगरजवळील खुशालसार भागातील ते रहिवासी आहेत. दमास्कस सिरीयातून ते आल्यानंतर त्यांना इराकी प्रसासनाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या सोबत असणारा 70 जणांचा समूह चार देशांच्या यात्रेच्या अंतिम टप्प्यात होता.

मला 13 दिवस नजफ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर 14 दिवस मुस्सायिब कारागृहात ठेवण्यात आले. मी माझ्या आयुष्यात एकही गुन्हा केला नाही. मग माझ्या कुटुंबियांचा आणि माझ्या पालकांचा आनंद का हिरावून घेतला? माझा कोणताही दोष नसताना मला महिनाभर तुरूंगात का डांबले, असे सवाल त्यांनी केले. दोहा, कतारहून नवी दिल्लीकडे जाण्याआधी ते प्रसिध्दी माध्यामांशी बोलत होते.

बगदादमधील भारतीय दुतावासाने त्यांच्या भारतीयत्वाची खातरजमा केल्यानंतरही इंटरपोलने त्यांना विमान तळावर रोखून धरले. कारण याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. मात्र त्याचे व्हिासा ऍपरेटर अन्वर उल मुस्ताफा यांणच्या मध्यस्थी नंतर त्यांना विमानत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.