जे तुम्हाला 70 वर्षांमध्ये जमले नाही ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कलम 370 वरून विरोधकांवर टीका

नवी दिल्ली : देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तर स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ध्वजवंदन करून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यातही कलम 360 संदर्भात त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत तुम्हाला जे 70 वर्षांमध्ये जमले नाही ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवले असा टोलाही लगावला. सत्तेत आल्यानंतर अवघ्या 10 आठवड्यांमध्ये आम्ही कलम 370 हटवलं, तिहेरी तलाक रद्द केला असंही मोदींनी या भाषणामध्ये सांगितले. लाल किल्ल्यावर झेंडावंदन करण्यापूर्वी मोदींनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली. मोदींनी आपल्या भाषणामध्ये भ्रष्टाचार, गरीबी, पूरपरिस्थितीपासून सरकारी योजनांपर्यंत अनेक विषयांना मोदींने हात घातला. त्याचबरोबर त्यांनी नाव न घेता कॉंग्रेसवर अनेक मुद्द्यांवरुन टिका केली.

कलम 370 संदर्भात बोलताना मोदींनी नाव न घेता कॉंग्रेसवर आणि विरोधी पक्षांवर टिका केली. नवीन सरकार सत्तेमध्ये येऊन 10 आठवडेही झालेले नाहीत तरी या कालावधीमध्ये कलम 370 हटवलं, तिहेरी तलाक रद्द करण्यासारखे महत्वाचे निर्णय आम्ही घेतले. कलम 270 हटवण्याचे काम 70 वर्षांमध्ये झाले नाही ते आम्ही नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर 70 दिवसांच्या आत करुन दाखवलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. ऐतिहासिक विजयानंतर आणि लोकसभेच्या ऐतिहासिक अधिवेशनानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.