पुणे -शहरात मागील 24 तासांत नवीन 4 हजार 119 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बरे झालेल्या 5 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील 65 रुग्णांसह 90 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या 43 हजार 244 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 391 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याशिवाय 6 हजार 658 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत 4 लाख 19 हजार 518 पुणेकरांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 3 लाख 69 हजार 477 रुग्ण बरेही झाले आहेत. आजपर्यंत एकूण 6 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 19 हजार 537 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.