Imtiaz Jaleel Statement : मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘मुंब्रा हिरवा करू’, या केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर सहर शेख यांनी माफी देखील मागितली. मात्र एकीकडे सहर यांच्या विधानावरून वाद निर्माण झालेला असतानाच एमआयमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शेख यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. तसेच ‘मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू,’ असे विधान जलील यांनी केले. यावेळी त्यांनी थेट भाजपच्या काही नेत्यांवर देखील निशाणा साधला. इम्तियाज जलील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “एक तोतला येतो आणि पोलिसांमध्ये जातो. त्याने जेवढी लोकं पोलिस ठाण्यात आणली त्या पेक्षा अधिक लोकं मी पोलिस ठाण्यात घेऊन येतो. Imtiaz Jaleel Statement : Imtiaz Jaleel Statement : इम्तियाज जलील यांचा सहर शेखला पाठींबा तुम्ही जे अजित पवारांचे अहिल्यानगरचे आमदार मुस्लिमांवर खालच्या भाषेत टीका करतात, नितेश राणे ज्या भाषेत मुस्लिमांनावर बोलतात, भाजपची महिला नेता मुस्लिमांबाबत जी भाषा वापरतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? भाजपचे नेते, आमदार हे मुस्लिमांना धमकी देतात, मशिदीत घुसून मारण्याची भाषा बोलतात तेव्हा पोलिस कारवाई का करत नाही?’ असा सवाल उपस्थित केला. Imtiaz Jaleel Statement : US Winter Storm : अमेरिकेत हिमवादळामुळे कहर ; वीजपुरवठा खंडित, १३,००० उड्डाणे रद्द ‘मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू’ पुढे बोलताना ते म्हणाले, मुंब्राच काय आम्ही सबंध महाराष्ट्र हिरवा करू. त्यामध्ये गैर काय? हिरवा रंग दहशतवादी आहे का? सहर यांचे हिरवा रंगा संदर्भात केलेले विधान आक्षेपार्ह कसे होऊ शकते? माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कोणीही त्यांच्यावर दबाव आणू नये. माफी मागण्यासाठी दबाव आल्यास त्याला उत्तर देण्यास मी समर्थ आहे.” तसेच सहर यांना पोलिसांनी कोणत्या कायद्याने आणि कलमाने नोटीस बजावली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करत सहर यांना पाठींबा दिला. दरम्यान, सहर यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. ‘कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता’, असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले होते. हेही वाचा: Shakeel Ahmad : “मी त्यांच्यापेक्षा असुरक्षित नेता कधीच पाहिला नाही” ; राहुल गांधींना काँग्रेसच्याच नेत्याकडून घरचा आहेर